Chiplun
Chiplun  Team Lokshahi
मनोरंजन

दापोली लाडघर समुद्रकिनाऱ्यावर पार पडला मराठी अभिनेता आशय कुलकर्णीचा विवाह सोहळा

Published by : Sagar Pradhan

निसार शेख। चिपळूण: कोकणात सागरी निसर्गाच वरदान लाभलेला सागरी किनाऱ्यांची भूरळ पर्यटकांना नेहमीच पडते याच समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वीही लग्न सोहळयासारखे अनेक कार्यक्रम केले आहेत. काही चित्रपट,डेली सोप च्या शुटिंग्जही येथे झाल्या आहेत. कोकणात लाडघर तामसतीर्थ आशय कुलकर्णी सुद्धा लग्नबंधनात अडकला आहे. त्याची गर्लफ्रेंड सानिया गोडबोले सोबत तो विवाहबद्ध झाला आहे. दापोली तालुक्यातील  लाडघर तामसतीर्थ समुद्रकिनारी सर्वात ज्येष्ठ पर्यटन व्यवसायिक मंगेश मोरे यांच्या 'सागर सावली बीच रिसॉर्ट' वर हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

या त्याच्या लग्नसोहळ्याला विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या सेलिब्रेटी जोडप्याने हजेरी लावली होती. याशिवाय या दोघांच्याही जवळच्या मित्रमैत्रिणींनी तसेच नातेवाईकांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. अभिनेता आशय कुलकर्णीने त्याची दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी सानिया गोडबोले हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अगदी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. मात्र मुंबई पुणे नाही तर थेट कोकणात सागराच्या साक्षीने दापोलीत लाडघर येथील निसर्गरम्य आणि समुद्र किनारी या दोघांचाही लग्नसोहळा आनंदात संपन्न झाला. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आशय कुलकर्णी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. माझा होशील ना, सुंदरी, पाहिले न मी तुला या मालिकेत तो झळकला आहे. लवकरच तो सोनाली कुलकर्णीसोबत 'व्हिक्टोरिया' सिनेमात झळकणार आहे. त्यासाठी त्याने लंडनमध्ये शूट केले आहे. मराठी चित्रपट इंडस्ट्रीमधील अग्रगण्य असलेला अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे लोकप्रिय कपल नुकतच विवाहबंधनात अडकले आहे आता पाठोपाठ आशय कुलकर्णी याने लग्नसोहळयाची गुड न्यूज दिली आहे.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल