जेष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या पहिल्या भेटींदरम्यानचा अनुभव एका मुलाखतीदरम्यान शेअर केला. त्यांनी केलेले मधुबालाजींच्या पायाचे वर्णन अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे असेच होते.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयाने वर्चस्व प्रस्थापित करणारे जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलेले किस्से हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या त्यांचे किस्से सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसत आहेत. त्यात गब्बर सिंगला "अरे ओ सांबा" असे बोलायला शिकवणे असो किंवा खुद्द ऑटोग्राफ घेण्यासाठी अभिनेते संजीव कुमार सचिनजींच्या घरी आलेला किस्सा असो... ह्या गोष्टी सध्या सोशल मीडियावर थैमान घालत आहेत. त्यातच आता एका मुलाखतीदरम्यान सचिन पिळगांवकर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला विषयी विशेषतः त्यांच्या सुंदर पायांविषयी त्यांना काय वाटले याबदल त्यांनी दिलखुलासपणे सांगितले.
सचिन पिळगांवकर हे त्यांच्या लहानपणी वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांची सही घेण्यासाठी गेले. त्याकाळी त्यांच्याकडे ऑटोग्राफ डायरी वैगेरे नसल्यामुळे त्यांनी आपल्या शाळेच्या वहीवरच पेनाने त्यांची सही अर्थात त्यांची ऑटोग्राफ घेतली. मात्र सुरुवातीला अभिनेत्री मधुबाला यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अनाहूतपणे “मधू आंटी” अशी हाक मारली.त्यामुळेच अभिनेत्री मधुबाला यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि त्यांना त्यांची सही मिळाली.
दरम्यानच्या काळात सचिनजी अभिनेत्री मधुबाला यांचे सौंदर्य न्याहाळत असताना अचानकपणे त्यांची नजर अभिनेत्री मधुबाला यांच्या पायावर स्थिरावली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या विलोभनीय सौंदर्याप्रमाणेच त्याचे पाय सुद्धा सुबक आणि आकर्षक होते. त्यांच्या पायाच्या सौदर्यांनी सचिनजींचे मन एकदम भरून आले. त्यांना हा क्षण एकदम आयुष्यावर ठसा उमटवणारा क्षण वाटला. "अभिनेत्री मधुबाला जितक्या सुंदर होत्या त्यापेक्षा दहा पटींनी जास्त त्यांचे पाय अधिकच आकर्षक होते "असे ते म्हणाले. सचिन पिळगांवकर यांच्यासाठी अभिनेत्री मधुबाला यांची ही सही आणि त्याबरोबरच त्यांच्या पायांचे अप्रतिम सौंदर्य अविस्मररणीय आठवणींपैकी एक बनले आहे. अभिनेत्री मधुबाला यांच्या पाण्यासारखे विलोभनीय आणि सुंदर पाय सचिनजींनी यापूर्वी कधीच कुठे पहिले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.