मनोरंजन

कलावंत मराठी घेऊन येत आहेत एक नवा कलाविष्कार; लवकरचं येणारं ‘घुंगराची चाळ’ गाणं

Published by : Dhanshree Shintre

मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील कलासंस्कृतीचं नव्या पद्धतीनं दर्शन घडवण्यासाठी कलावंत मराठी घेऊन येत आहेत एक नवा कलाविष्कार. होतकरू नव्या दमाच्या कलाकारांना मिळणारं त्यांच्या हक्काचं व्यासपीठ. शंकर बाबा या गाण्याच्या यशानंतर कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळ’ गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधून कलावंताच्या जगण्याची कथा उलगडणार आहे. हे गाणं दर्शन घोष यांनी लिहीलं असून दिग्दर्शन ही त्यांनीच केलं आहे. तसेच या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर आहेत. किरण कोरे, सुरेखा पुणेकर, निकिता भोरपकर हे कलाकार या गाण्यात आहेत.

निर्माते निलेश मनोहर मुणगेकर कलावंत मराठीविषयी सांगतात, “कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. हाच माझा कायम हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा किंवा मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आत्तापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी 100 हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. कलावंत मराठीच्या सर्वच कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो. हीच सदिच्छा!!”

दिग्दर्शक दर्शन घोष नव्या गाण्याविषयी सांगतात, “सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंडींग जगात हिंदी, इंग्रजी गाण्यांसोबतचं मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत वेगवेगळे बदल होत आहेत. परंतु या स्पर्धात्मक जगात आपल्या महाराष्ट्रातील लोकसंगीत सादर करणा-या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी कलावंत मराठीची संपूर्ण टीम कार्यरत आहे. आमच्या पहिल्या शंकर बाबा गाण्याच्या यशानंतर आम्ही घुंगराची चाळ हे नवं गाणं घेऊन येत आहोत. या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच गाण्याची उत्सुकता असल्याचं ही प्रेक्षक कमेंट्स करून सांगत आहेत. हे पाहून खरचं आनंद गगनात मावत नाही आहे.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य