Kedar Shinde Team Lokshahi
मनोरंजन

"तुझं आयुष्यात येण... केदार शिंदे यांची पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत...

दिग्दर्शन केदार शिंदे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सध्या केदार शिंदे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Published by : shamal ghanekar

केदार शिंदे (Kedar Shinde) हे मराठी दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. मराठी माध्यमांमधील नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रामध्ये केदार शिंदे यांनी उत्तम कामगिरी केली आहे. ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde)सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रीय असतात. सध्या केदार शिंदे यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. नुकताच त्यांनी बायकोसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. केदार शिंदे आणि त्यांची पत्नी बेला शिंदे यांच्या लग्नाला 26 वर्षे पुर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी बायकोसाठी एक खास पोस्ट केली आहे.

काय आहे पोस्टमध्ये

केदार शिंदेनी त्यांनी इंटाग्रामवर एक पोस्ट (Post) शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज आपल्या लग्नाला 26 वर्ष पुर्ण झाली. खरतर तू पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयाला होकार दिलास, तेव्हा या क्षेत्रात मी धडपड करत होतो. तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी भाग्यशाली ठरलं. म्हणजे एकाच रात्रीत आकाशाला हात लागले असं नाही. मात्र एक दिशा मिळाली पुढच्या प्रवासाची.

आजही आपण धडपडतोच आहोत. स्वामी कृपेने दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था चोख आहे. मात्र, तुझी खुप स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय. माझा ECG सारख्या करीयर ग्राफ! तू नेहमीच प्रत्येक चढ उतार क्षणी,साथ देतेयसं!!स्वामी म्हणतात “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि तुझं म्हणणं असतं “मी तुझ्या सोबत आहे”. तुम्हा दोघांच्यामुळेच मी पुढची वाटचाल करणार आहे. मला “सना” सारखं गोड स्वप्न प्रत्यक्षात दिलस. तुम्हा दोघांसाठीच आयुष्यभर जगेन, धडपडेन.....

केदार शिंदेनी शेअर केलेल्या फोटो (Photo) फार जुना असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये केदार शिंदे हे पत्नीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेले दिसत आहेत. तर त्यांची पत्नी ही बाहेर बघत असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत