मनोरंजन

सई- ललितचा बहुचर्चित ‘कलरफुल’ चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क
२०२० वर्षानं प्रेक्षकांना जाता जाता अनलॉकचं गिफ्ट दिलं, आणि आता नवनवीन मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या घोषणा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठीतल्या बहुचर्चित 'कलरफुल' सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे. नुकताच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. येत्या 2 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा सिनेमा घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच या सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालं आणि सोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली.

नुकतेच चित्रपटातील कलाकारांनी या सिनेमांचे पोस्टर सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. हे नवीन पोस्टर अतिशय सुंदर असून रोमँटिक धुक्यात हरवलेल्या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेली सई आणि ललितची जोडी अतिशय मोहक दिसत आहे. प्रेमानं ओतप्रोत असलेले त्यांचे डोळे आणि दोघांच्या कानावर लावलेलं फुल हे या पोस्टरवर लक्षवेधी ठरत आहे. पोस्टर पाहून चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा