मनोरंजन

“मर्द को दर्द नही होता” म्हणतं अभिषेक बच्चन कामावर पुन्हा रुजू

Published by : Lokshahi News

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला नुकतच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता अभिषेकने एक पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीची माहिती देत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

अभिषेक बच्चनने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात अभिषेक मास्क घालून एका खुर्चीवर बसल्याचं दिसतंय. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर बेल्ट आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, "मागच्या बुधवारी चैन्नईमध्ये माझ्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु असताना एक विचित्र दुर्घटना घडली. माझ्या उडव्या हाताला फ्रॅक्चर झालं. यासाठी सर्जरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी लगेचच मुंबईला आलो. सर्जरी झाली आहे. सर्व काही पॅच अप आणि कास्टही झालंय." असं म्हणत अभिषेकने त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलंय.

एवढचं नव्हे तर सर्जरीनंतर आठवडा झाला नाही तर अभिषेक पुन्हा कामासाठी सज्ज झालाय. पोस्टमध्ये तो म्हणाला, "पुन्हा चैन्नईला जाण्यासाठी तयार आहे. जसं की म्हणतात शो मस्ट गो ऑन… आणि जसं माझ्या वडिलांनी म्हंटलंय, मर्द तो दर्द नही होता. ठिक आहे… ठिक आहे थोडं दुखलं" अशा अंदाजात म्हणत अभिषेकने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि त्याची मुलगी श्वेता हिला लीलावती रुग्णालयामध्ये पहिला गेलं होत. पण बच्चन कुटुंबीय तिथे का गेलं होते याचा उलगडा अजून पर्यत झाला नव्हता. अभिषेकच्या या पोस्ट नंतर या गोष्टीची उकल प्रेक्षकांना झाली असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा