मनोरंजन

मेघराज राजेभोसलेंना अध्यक्षपदावरून हटवले, सुशांत शेलार नवे अध्यक्ष

Published by : Shweta Chavan-Zagade

कोल्हापूर|सतेज औंधकर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना अध्यक्षपदावर हटवण्यात आले. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह अभिनेता सुशांत शेलार यांची महामंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या प्रमुख कार्यवाहपदी रणजित जाधव यांची निवड करण्यात आली.

दरम्यान आजच्या (22 जून ) कार्यकारिणीच्या बैठकीकडे मेघराज राजेभोसले हे गैरहजर होते. मेघराज राजे भोसले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक संचालकांनी आक्षेप नोंदवला होता गेले वीस महिने त्यांनी कार्यकारिणीची बैठक बोलावली नव्हती. सध्याच्या कार्यकारिणीची मुदत संपून वर्षभराचा कालावधी उलटला होता. कार्यकारिणीची मीटिंग न झाल्यामुळे कोणतेही निर्णय होत नव्हते. महामंडळाच्या अनेक संचालक आणि प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यानंतर कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली.

कोल्हापूर येथील हॉटेल के ट्री येथे संचालक यांची मिटिंग झाली. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महामंडळाच्या कार्यकारिणीने 26 नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्या सभेचे इतिवृत्तांत आजच्या बैठकीत मंजूर करावा असा विषय मांडण्यात हा विषय कार्यकारणी मध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आजच्या बैठकीला प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, रणजित जाधव, सतीश बिडकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, निकिता मोघे, शरद चव्हाण हे संचालक उपस्थित होते.

याशिवाय स्वीकृत संचालक रवि गावडे रत्नकांत जगताप उपस्थित होते. कार्यकारणीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले. भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलेला गेल्या बैठकीतला इतिवृतांत या सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे र भोसले यांचे अध्यक्षपदी संपुष्टात आले. कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते सुशांत शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर रणजित जाधव यांच्याकडे प्रमुख कार्यवाह पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. महामंडळाचे एकूण 14 संचालक आहेत.

बैठकीला मेघराज भोसले वर्षा उसगावकर संजय दुबे चैत्राली डोंगरे विजय खोचीकर अनुपस्थित होते. दरम्यान संचालिका वर्षा उसगावकर यांनी पत्र पाठवून कार्य करणे जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा राहील कळविले होते. अध्यक्षपदी शेलार व प्रमुख कार्यवाहपदी जाधव यांची निवड झाल्यानंतर महामंडळाच्या माजी संचालकांनी व विद्यमान संचालकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला यावेळी अभिनेता विजय पाटकर, इम्तियाज बारगीर,मिलिंद अष्टेकर , प्रिया बेर्डे ,अरुण चोपदार, अमर मोरे, सतेज स्वामी, बाळासाहेब बारामती, सदाशिव पाटील , निलैश जाधव, सुनील मुसळे, विजय ढेरे आदी उपस्थित होते.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...