मनोरंजन

Lionel Messi: आठव्यांदा Ballon d’Or पुरस्काराने सन्मानित मेस्सी, ट्रॉफी जिंकणारा पहिला एमएलएस खेळाडू ठरला

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विक्रमी 8व्यांदा बॅलन डी'ओर जिंकला आहे. या विजेतेपदाच्या शर्यतीत त्याने मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडचा पराभव केला.

Published by : Team Lokshahi

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विक्रमी 8व्यांदा बॅलन डी'ओर जिंकला आहे. या विजेतेपदाच्या शर्यतीत त्याने मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडचा पराभव केला. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गेल्या वर्षी फिफा विश्वचषक जिंकला, या स्पर्धेत कर्णधाराने 7 गोल केले आणि 3 असिस्ट केले आणि गोल्डन बॉल जिंकला. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बॅलन डी'ओ जिंकला आहे. मँचेस्टर युनायटेडचे माजी खेळाडू आणि इंटर मियामीचे सहमालक डेव्हिड बेकहॅम यांनी पॅरिसमध्ये मेस्सीला पुरस्कार प्रदान केला.

बॅलन डी'ओर पुरस्कार किती खास आहे हे जाणून घ्या

आम्ही तुम्हाला सांगतो की, बॅलन डी' ओर हा फुटबॉलचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो वैयक्तिक खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

1. जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटूच यासाठी पात्र आहेत.

2. 1956 पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

3. 2018 पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डी ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे.

4. 2020 मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नाही.

Ballon d'Or अवॉर्ड फ्रांसमधील फुटबॉल मासिक बॅलन डिओरच्या वतीनं देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली, जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तेव्हापासून हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, 2018 पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा