मनोरंजन

‘मी होणार सुपरस्टारच्या’ डान्सिंग होर्डिंगचं अनावरण दादरमध्ये

Published by : Lokshahi News

मी होणार सुपरस्टार या डान्स रिअलिटी शोच्या माध्यामतून अंकुश चौधरी छोट्या पडद्यावर आगमन करत आहे.स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील स्पर्धक या शो मध्ये सामील होणार असून कृती महेश आणि वैभव घुगे सारखे कप्टन असणार आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार अर्थातच अंकुश चौधरी या कार्यक्रमाचा सुपरजज असणार आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतल्या दादर येथील प्लाझा थिएटर येथे मी होणार सुपरस्टारचं डान्सिंग होर्डिंग दिमाखात झळकलं. सुपरजज अंकुश चौधरीच्या हस्ते जल्लोषात या डान्सिंग होर्डिंगचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी मी होणार सुपरस्टार कार्यक्रमातील लायन्स ग्रुप आणि मायनस थ्री हे दोन ग्रुप्स देखिल उपस्थित होते. या दोन्ही ग्रुप्ससोबत ठेका धरत अंकुशने या कार्यक्रमाचा आनंद लुटला. डान्सिंग होर्डिंगचा हा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी करण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचं अंकुश चौधरी यांनी कौतुक केलं.

'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवणार आहेत. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळतील. मी होणार सुपरस्टार २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले