Mirzapur Season 3 Team Lokshahi
मनोरंजन

मिर्झापूरचा तिसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मिर्झापूर मालिकेत कालिन भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर एक अपडेट केले शेअर

Published by : Akash Kukade

अँमेझॉन प्राइमच्या मिर्झापूर या वेब सीरिजच्या (Web series) तिसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निर्माते 'मिर्झापूर 3' च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेचा तिसरा सीझन यावर्षी रिलीज होणार आहे.

कालिन भैय्याच्या पत्नीने दिले महत्वाची अपडेट

वास्तविक, मिर्झापूर मालिकेत कालिन भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने (Rasika Dugal) नुकतेच तिच्या सोशल मीडियावर एक अपडेट जारी केले आहे.

तिसऱ्या सीझनच्या स्टार कास्टचा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, की 'मिर्झापूर 3' लवकरच अँमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) व्हिडिओवर येणार आहे. या व्हिडिओमध्ये कालिन भैया, गुड्डू पंडित, मुन्ना भैया आणि बिना त्रिपाठी दिसत आहेत. याशिवाय तिसऱ्या सीझनची कथा अधिक रंजक बनवण्यासाठी निर्मात्यांनी काही नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टार कास्ट कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

मिर्झापूरचा तिसरा सिझन कधी येणार?

'मिर्झापूर 3' च्या स्टारकास्टचा व्हिडिओ शेअर करत रसिका दुग्गलने लिहिले- 'मिर्झापूर सीझन 3' (Mirzapur Season 3) येणार आहे. तो कधी येईल हे फक्त अँमेझॉन प्राइम व्हिडिओच सांगू शकते. आता प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. त्यासाठी तुम्ही तयार रहा!'

अशी असेल सीझन 3 ची कथा

मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनमध्ये सर्व काही उद्ध्वस्त होते. गुड्डू पंडित कालिन भैया आणि त्याचा उत्तराधिकारी मुन्ना भैय्या यांच्या छातीत गोळ्या घालतात. ज्यानंतर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री विधवा होते आणि गुड्डू भैया मिर्झापूरच्या राजाच्या गादीवर बसतो. तिसऱ्या सीझनमध्ये नवीन कथा असेल, पण शत्रुत्व जुनेच असेल असे बोलले जाते आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा