मनोरंजन

Miss Kerala स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या मॉडेलचा भीषण अपघातात मृत्यू

Published by : Lokshahi News

केरळमधील कोच्ची येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघांची मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

समोर आलेल्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात या दोघी प्रवास करत असणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुअनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झालाय. गाडीच्या डॅशबोर्ड खालील कप्प्यांमधून गाडीचे कागदपत्रही आम्हाला काढता आले नाही, असं पोलीस म्हणालेत. या अपघातामध्ये ब्यूटी क्वीन असणाऱ्या दोन तरुणींचा घटनास्थळीच दूर्देवी अंत झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा