मनोरंजन

Money Heist | टोकियो झळकणार बॉलिवूडमध्ये?

Published by : Lokshahi News

मनी हाइस्ट'या स्पॅनिश वेब सीरिज प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतं आहे. या लक्षवेधी चोरांनी तब्बल चार सिझनमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. येत्या सप्टेंबर महिन्यात या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातील टोकियोची भूमिका साकारणारी उर्सुला कॉर्बेरो लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर आता उर्सुला हिने एका मुलाखतीत या बाबत खुलासा केला आहे.

खऱ्या आयुष्यात देखील उर्सुला स्वतःला ठराविक गोष्टीसाठी मर्यादीत ठेवायतं नाही. तिला आव्हानांना समोर जायला आवडतं. 'मनी हाइस्ट' बद्दल आणि एकंदरीत भारताबद्दल तिला असलेल्या आपुलकी बद्दल टोकियो म्हणजेच उर्सुलाने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी भारतात कधी आले नाही. मी भारत पाहण्यासाठी उत्सुक आहे. मला चित्रपटांची नावं लक्षात राहत नाही. मात्र मी भारतीय चित्रपट पाहिले आहेत. पण मला एका चित्रपटाचे नावं लक्षात आहे ते म्हणजे 'स्लम डॉग मिलेनियर'. हा चित्रपट मी पाहिला आहे आणि मला तो प्रचंड आवडला." उर्सुलाला जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की, "हा, जर माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्की काम करेन. मला हिंदी शिकवणारं कोणी असेल तर मला हिंदी चित्रपटात सुद्धा काम करायला आवडेल. "

दरम्यान बहुचर्चित वेब सीरिज 'मनी हाइस्ट'चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा