Shreyas Talpade On Instagram  Team Lokshahi
मनोरंजन

INSTARGAM वर 'या' मराठी अभिनेत्याचे सर्वाधिक फॉलोअर्स

1 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा केला पार

Published by : Akash Kukade

अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) मराठीसह हिंदीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या श्रेयस झी मराठीच्या (zee marathi) माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत आहे.

श्रेयसने इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. एवढे फॉलोअर्स असणारा तो मराठी मालिकेतील दुसरा अभिनेता ठरला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

काही दिवसांपूर्वी हृता दुर्गुळे ही इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली पहिली मराठीतील अभिनेत्री ठरली होती. तिने इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर मराठी मालिका विश्वात श्रेयसने 1 मिलियन फॉलोअर्स मिळवले आहेत. मोठा पडदा गाजवल्यानंतर छोट्या पडद्यावर त्याने कमबॅक केले आहे. त्याच्या या कमबॅकला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

श्रेयसचा चाहता वर्ग अधिक आहे. तसेच श्रेयसने प्रत्येक वयोगटातील लोकांवर स्वतःची छाप पाडली आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सध्या त्याच्या अभिनयामुळे अधिक चर्चेत आहे. आता श्रेयसचा हिंदी चित्रपट कौन प्रवीण तांबे हा चित्रपट सिनेमागृहात सुरू आहे. या चित्रपटाची देखील बरीच चर्चा रंगली होती.

आँखे या हिंदी चित्रपटातुन श्रेयसने सिनेसृष्टीत पाऊल टाकले. मराठी मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपटात श्रेयसने काम केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा