मनोरंजन

‘धर्मवीर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच

Published by : Lokshahi News

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. फक्त राजकीय नेता, कार्यकर्ताच नाही,तर त्यांच्या वैयक्तिक जीवनावर "धर्मवीर हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडीयावर लाँच करण्यात आले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाची निर्मीती साहिल मोशन आर्टस् या संस्थेतर्फे होणार आहे.अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटाचे निर्माते असणार आहे. मंगेश देसाई पहिल्यांदाच चित्रपटाचे निर्माण करणार आहे. प्रविण विठ्ठल तरडे यांनी "देऊळ बंद", "मुळशी पॅटर्न" असे गाजलेले चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले. त्यामंतर सरसेनापती हंबीरराव ह्या बहुचर्चित चित्रपटाचे देखील लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात आंनद दिघे यांची मुख्य भुमिका कोण साकारणार ? याचे उत्तर अजुनही मिळाले नाही.

चित्रपटाचे चित्रीकरण ठाण्यात सुरु करण्यात आले आहे. पण मुख्य भुमिकेत कोणता अभिनेता असेल याची उत्सुकता सगळ्यांच लागली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."