नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि मागील वर्षाला निरोप देण्यासाठी विविध ठिकाणी पार्टींचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींनाही जबरदस्त पार्टी केली. अशाच पार्टीतला अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मौनी आपल्या पती सूरज आणि मैत्रीण दिशा पटानीसोबत मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टीसाठी पोहोचली होती. पार्टीनंतर, जेव्हा ती क्लबबाहेर येत होती, तेव्हा पापाराझींनी तिच्या समोर घोळका केला. गाडीच्या दिशेने जात असताना मौनी पायऱ्यावर घसरली आणि पडली. व्हिडीओमध्ये ती मद्यपानामुळे तोल गेल्याचं दिसत आहे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मौनीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती रेस्टॉरंटमधून बाहेर येतेय. ती सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात आहे. मात्र ती बाहेर येताच चप्पल सटकून जोरात खाली पडते. तिला उठवण्यासाठी एकच घाई सुरू होते. तीळ हात देऊन उठवलं जातं. मात्र तिचा चेहरा अगदी मलूल होतो. तिला पडल्याबद्दल वाईट वाटतंय आणि तिला लागलंय असं तिचा चेहरा पाहून दिसतंय. तर पुढे जाताना ती लाजेने तिचा चेहराही झाकून घेते. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिलं, 'अरे एवढी प्यायची कशाला जर समोर बघून चालता येत नसेल.' आणखी एकाने लिहिलं, 'अरे तिला लागलं असेल.' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मौनीने 'देवो के देव महादेव' मधून सती बनून घराघरात स्थान मिळवलं. आता ती चित्रपटात करिअर करतेय.