मनोरंजन

अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नबंधनात; मौनी रॉयचा नवरा कोण आणि त्याची संपत्ती बघा

Published by : Lokshahi News

बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी मौनी रॉय (Mouni Roy) लग्नबंधनात अडकली. मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार यांनी 27 जानेवारी रोजी सकाळी गोव्यात दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न केले.

मौनी रॉयच्या बंगाली लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहत. लाल रंगाचा लेहेंगा आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. डोक्यावर गोटा वर्कचा दुपट्टा तसेच तिने कुंदनचे संपूर्ण दागिने परिधान केले आहेत. ब्राइडल मेकअप तर खूपच छान झाला आहे. सूरज नांबियार गोल्डन कलरच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. सूरज नांबियार हा दक्षिण भारतीय आहे, तर मौनी रॉय बंगालची आहे, त्यामुळे या जोडप्याने दोनदा लग्न केले.

दरम्यान, सूरज आणि मौनीची पहिली भेट डिसेंबर 2019 मध्ये दुबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली होती. दोघेही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे पोहोचले होते. दोघे अनोळखी म्हणून भेटले व दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. यानंतर सूरज आणि मौनी एकमेकांना पसंत करू लागले आणि डेटिंग सुरु झाली.

सूरज नांबियार याची संपत्ती

मौनी रॉय वर्षभरात 1-2 कोटींची कमाई करते. तिची संपत्ती 10 कोटी इतकी आहे. तर सूरज नांबियार हा बिझनेसमन आहे. त्यामुळे त्याची संपत्तीही खूप आहे. 50 कोटीहून अधिक असल्याचं कळतंय. बंगळुरुत 6 ऑगस्टला एका जैन कुटुंबात सूरजचा जन्म झाला. सूरजचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये झालं. नंतर 2008 मध्ये त्याने बेंगळुरूच्या आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग केलं. सूरज हा सध्या दुबईत राहत असला तरी त्याचा भाऊ नीरज हा पुण्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-संस्थापक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा