मनोरंजन

मिस्टर इंडियाला गायब करणारे प्रसिद्ध सिनेमॅफोटोग्राफर आणि स्पेशल इफेक्टसचे प्रदाते पीटर परेरा यांचं निधन

90 च्या दशकात आपल्या अदभुत कला कौशल्याने मिस्टर इंडियाला गायब करणारे प्रसिद्ध सिनेमॅफोटोग्राफर आणि स्पेशल इफेक्टसचे प्रदाते पीटर परेरा यांचं काल मंगळवार रोजी पहाटे निधन झालं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संदिप गायकवाड, वसई

90 च्या दशकात आपल्या अदभुत कला कौशल्याने मिस्टर इंडियाला गायब करणारे प्रसिद्ध सिनेमॅफोटोग्राफर आणि स्पेशल इफेक्टसचे प्रदाते पीटर परेरा यांचं काल मंगळवार रोजी पहाटे निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आता कुणीही नाही. त्यांच्यावर वसईच्या पापडी चर्चमध्ये मंगळवरी दुपारी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 90 च्या दशकात ज्यावेळी आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती झाली नव्हती त्या काळात पीटर परेरा यांनी आपल्या फोटोग्राफी आणि स्पेशल इफेक्टसने अनेक चित्रपट रोमांचकारी बनवले होते. 1987 साली अनिल कपूरच्या मिस्टर इंडियाने सर्व प्रवेशकांना भुरळ तर घातलीच होती.

सिनेसृष्टीत त्यांनी 'बॉबी' या सुपरहिट चित्रपटाचे छायाचित्रण केले होते. तसेच, शंभराहून अधिक चित्रपटांचं त्यांनी छायाचित्रण केलं होतं. पीटर परेरा यांनी रोटी, अमर अकबर अँथोनी, मिस्टर इंडिआ, शेषनाग, अजूबा, लाल बादशाह, तुफान, शेहनशांह, कुली, मर्द, याराना, खिलाडीयों का खिलाडी, आ गले लग जा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. तर मिस्टर इंडिया, शेषनाग, अजूबा सारख्या चित्रपटांना स्पेशल इफेक्टस पीटर परेरा यांनी दिलं होतं.

'मिस्टर इंडिया' या चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'अजूबा' आणि सनी देओलच्या 'बॉर्डर' चित्रपटातही पीटर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पीटर यांचे वडीलही या उद्योगाशी संबंधित होते. पीटर यांनी मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे वडील जरी या इंडस्ट्रीशी निगडीत असले तरी बालपणी ते कधीही चित्रपटाच्या सेटवर त्यांच्याबरोबर गेले नव्हते. ते नोकरीच्या शोधात असतानाच ते चेंबूरच्या होमी वाडियाच्या बसंत स्टुडिओत रुजू झाले. तिथे त्यांना खूप काही शिकायला मिळाले. यातून ते कॅमेरा वापरायलाही शिकले. पीटर परेरा यांनी अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला होता. वसई विकासिनी या संस्थेत त्यांनी स्वतःच्या नावाने आर्ट गॅलरी उभी करून दिली होती. त्यांच्या या निधनाबद्दल सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका