Shaktimaan  Team Lokshahi
मनोरंजन

Shaktimaan : 'शक्तिमान' चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

'शक्तिमान' मालिकेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : shamal ghanekar

90 च्या दशकातील प्रेक्षकांची आवडती मालिका शक्तिमान हिला पसंती मिळाली होती. काही दिवसांपूर्वी सोनी पिचर्स यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये 'शक्तिमान' (Shaktimaan) मालिकेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता 17 वर्षांनंतर हा शक्तिमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने प्रेक्षक पण त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता मालिकेच्या माध्यमातून नाही तर चित्रपटाच्या माध्यमातून 'शक्तिमान' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबद्दलची माहिती एका मुलाखतीमध्ये मालिकेमधील शक्तिमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी दिली आहे. मुकेश खन्ना म्हणाले की, 'खूप वर्षांनी हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला असून लोक मला शक्तीमान 2 बनवण्यासाठी सांगत असतं. तसेच मला शक्तीमानला पुन्हा टीव्हीवर आणायचे नाही. या चित्रपटासाठी किमान 300 कोटींचे बजेट असणार आहे.' असेही ते म्हणाले.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की,' या चित्रपटासाठी 300 कोटी रुपयांचे बिग बजेट असून हा चित्रपट पुर्ण होण्यासाठी वेळ लागेल, हा चित्रपट स्पायडर मॅनचे निर्माते बनवणार आहेत. पण हा चित्रपट देसी संकल्पनेवर आधारित असणार आहे. ते म्हणाले की चित्रपटाची कथा मी माझ्याचं पद्धतीने तयार केली आहे. प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की कोण होणार शक्तीमान? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर मी आता देणार नाही.

13 सप्टेंबर 1997 रोजी शक्तिमान ही मालिका प्रदर्शित झाली. त्याचप्रमाणे आता शक्तिमान या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाची अजूनही रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा