मनोरंजन

Video : अक्षय कुमारला केलं ‘त्या’ महिलेने विमानतळावरच किस, व्हिडीओ व्हायरल

Published by : Team Lokshahi

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. अक्षय कुमार नेहमीच वेगवेगळ्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असतो. आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहते मंडळी नेहमीच उत्सुक असतात. हे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना पाहून आनंदाच्या भरात काहीही करतात.

नुकताच अक्षय कुमार दिग्दर्शक आनंद एल राय यांच्याबरोबर मुंबई विमानतळावर दिसला. तो आपल्या गाडीच्या दिशेने जात असताना एका महिलेने त्याला पाहिलं. अक्षयला पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने लगेचच अक्षयला येऊन किस केलं. अक्षयला देखील याची कल्पना नव्हती. एका महिलेने अचानक येऊन किस केलेलं पाहता तोही आश्चर्यचकित झाला.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही महिला वृद्ध असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या ११ ऑगस्टला त्याचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. शिवाय ‘राम सेतू’ चित्रपटामध्येही तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?

Kartiki Gaikwad: लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी झाली आई

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया