मनोरंजन

Munawar Faruqui: मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता

Published by : Dhanshree Shintre

Big Boss 17 Winner: बिग बॉस सीझन 17 मुनावर फारुकीच्या नावावर आहे. सगळ्यांना मागे टाकत मुनव्वरने यंदाचा सीजन जिंकला आहे. सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. टॉप 2 मध्ये त्याच्यासोबत अभिषेक कुमार होता. मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्यात चुरस होती. या दोघांशिवाय अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी फिनालेमध्ये पोहोचले होते. शोच्या आधीही अनेक पोल मुनव्वर या शोचा विजेता ठरणार असल्याचे संकेत देत होते. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे आणि पहिल्या आठवड्यापासून तो लोकप्रियतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरचा आज वाढदिवसही आहे. मुनव्वर फारुकीला स्पेशल बर्थडे गिफ्टही मिळालं.

बिग बॉस शोच्या शेवटच्या सीझनमध्ये विजेत्याच्या घोषणेपूर्वी स्पर्धकांना पैशांनी भरलेली एक ब्रीफकेस देण्यात आली होती. ही ब्रीफकेस निशांत भट्टने सीझन 15 मध्ये आणि अर्चना गौतमने सीझन 16 मध्ये घेतली होती. यावेळी तसे झाले नाही. मन्नारा चोप्रा या शोच्या टॉप 3 मध्ये होती. मात्र, त्यानंतर तिला शोमधून बाहेर काढण्यात आले. शोमधील तिचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. अनेकवेळा कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागले. पण तरीही मन्नाराने टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपले स्थान निर्माण केले होते.

विजेता म्हणून मुनव्वर फारुकीचा हा दुसरा रिअॅलिटी शो आहे. याआधी त्याने शो लॉकअपचा किताब जिंकला होता. इतक्या अडचणींनंतर आणि त्याच्या व्यक्तिरेखेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतरही त्याने हा शो जिंकून सगळ्यांना गप्प केले आहे. मुनव्वर फारुकी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि त्याची लोकप्रियता जगभरात आहे. विजेता होण्यापूर्वीच मुनव्वर फारुकी हा ट्रॉफीच्या शर्यतीतील प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता. त्याने कंगना राणौत स्टारर शो लॉकअपची ट्रॉफी जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. मुनव्वर फारुकीच्या समर्थनार्थ, बादशाह, रफ्तार, किंगपासून ते जॅकलीन फर्नांडिसपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पाठिंबा दर्शविला आणि प्रेक्षकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप

Daily Horoscope 15 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मिळणार शुभ संकेत; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा निर्णय

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?