Kangana Ranaut's much awaited show Lock Upp Trailer are eagerly awaiting, breaking news 
मनोरंजन

Lock Upp Trailer | कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ मध्ये आणखी एक स्पर्धक कैदी

Published by : Shweta Chavan-Zagade

आपल्या वक्तव्यांनी रोज नवा वाद ओढवून घेणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) लवकरच 'लॉक अप' हा (Lock Upp Trailer) रिअ‍ॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. एकता कपूरच्या बहुप्रतिक्षीत शोचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आणि साहजिकच सोशल मीडियावर (social media ) या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.  'लॉक अप ( Lock Upp Trailer ) या शोमधील पहिला स्पर्धक निशा रावलचे नाव घोषित केल्यानंतर निर्मात्यांनी आता कंगना राणौतने होस्ट केलेल्या शोच्या दुसऱ्या स्पर्धकाची ओळख उघड केली आहे.

कंगना राणौतच्या बहुप्रतिक्षित शो लॉकअपची (Lock Upp Trailer) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या शोला आणखी एक कैदी मिळाला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन मुनावर फारुकी आता कंगनाच्या लॉकअपमध्ये अत्याचारी गेम खेळताना दिसणार आहे. कंगनाच्या तुरुंगात राहण्यासाठी मुनव्वरला त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलगडावी लागणार आहेत. मुनावर फारुकी व्यतिरिक्त, आणखी 15 सेलिब्रिटी कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) लॉक अपचा भाग असणार आहेत. या शोमध्ये सर्व स्पर्धकांना हातकडी लावून तुरुंगात बंद केले जाईल. त्यानंतर अत्याचाराचा खेळ सुरू होईल.

'लॉक अप' त्याच्या अनोख्या आणि कधीही न ऐकलेल्या फॉरमॅटमुळे लॉन्च झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनला आहे. एकता कपूर हा रिअॅलिटी शो भारतीय प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी सज्ज आहे, जो 27 फेब्रुवारीपासून Alt Balaji आणि MX Player वर विनामूल्य दाखवला जाईल . हा शो बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत होस्ट करणार असुन यामध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटींना महिनोनमहिने तुरुंगात टाकण्यात आलेले दिसतील. हा शो 27 फेब्रुवारी 2022 रोजी प्रीमियर होणार आहे. Alt Balaji आणि MX Player या प्लॅटफॉर्मवर शो 24×7 लाइव्ह स्ट्रीम करतील आणि दर्शकांना स्पर्धकांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देखील देतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी