मनोरंजन

मैत्रीची वीण घट्ट करणाऱ्या 'मुसाफिरा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री महत्वाची असते, हे अधोरेखित करणारा 'मुसाफिरा' चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री महत्वाची असते, हे अधोरेखित करणारा 'मुसाफिरा' चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरमध्ये हे चारही 'मुसाफिरा' एकत्र दिसत असून या चौघांची ओळख या पोस्टरमधून होत आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रॉडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत 'मुसाफिरा' या चित्रपटाचे पुष्कर जोग दिग्दर्शक आहेत. 'मुसाफिरा'च्या घोषणेपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. आता या नवीन पोस्टरमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढणार आहे.

'मुसाफिरा'मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग 'निशांत'ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार 'मेघा'च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या 'अमेय'च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली 'मिथिला' साकारणार असून ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या 'क्रेया'च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे. या चौघांच्या या भन्नाट पोस्टरममधून त्यांचे बॉंडिंग दिसत आहे. आता ही मैत्री कोणत्या वळणावर जाणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' हा चित्रपट प्रेक्षकांना नॉस्टेल्जिक बनवेल. चार वेगवेगळ्या पार्श्वभूमी असणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. यात प्रेम आहे, मैत्री आहे, दुरावाही आहे. त्यामुळे हे रियुनियन त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणणार का, त्यांचा सगळ्यांचा प्रवास वेगळ्या मार्गाने होणार, याचे उत्तर 'मुसाफिरा'मधून मिळणार आहे. हा चित्रपट तुम्हालाही तुमच्या मैत्रीची आठवण करून देईल.''

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी