मनोरंजन

मराठी अल्बम सृष्टीत संगीतकार प्रशांत नाकतीच्या 'मी सिंगल'चा आला तिसरा पार्ट

तुम्ही किंवा तुमच्या ग्रूपमधील कोणता मित्र किंवा मैत्रीण सिंगल आहे का ? मग हे गाणं तुम्ही नक्की ऐका...!!

Published by : Team Lokshahi

तुम्ही किंवा तुमच्या ग्रूपमधील कोणता मित्र किंवा मैत्रीण सिंगल आहे का ? मग हे गाणं तुम्ही नक्की ऐका...!! 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणारा संगीतकार 'प्रशांत नाकती' घेऊन आलाय एक धम्माल गाणं. संगीत सृष्टीत पहिल्यांदाच कोणत्यातरी अल्बमच्या गाण्याचा तिसरा भाग प्रदर्शित होत आहे. याआधी 'मी सिंगल' आणि 'माझी जानू' यानंतर तिसरा भाग म्हणजेच 'हर्टब्रेक झाला' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

प्रशांतची 'पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी  अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात. प्रशांत नाकती 'हर्टब्रेक झाला' या गाण्याविषयी सांगतो, "हर्टब्रेक झाला हे गाणं मी सिंगल या गाण्याचा तिसरा भाग आहे. मी सिंगल आणि माझी जानू या गाण्यांना भरभरून प्रेम मिळालं. खरतरं ही एक तिनं मित्रांची गोष्ट आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, गौरी पवार, सृष्टी आंबवले आणि स्नेहल लांघे हे कलाकार आहेत. प्रत्येकवेळी या दोन मुलांना मुलगी मिळत नाही. ते सिंगल राहतात. अशी एक धम्माल गोष्ट या तिन्ही गाण्यांमध्ये दिसून येते. हे गाणं केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे."

पुढे तो सांगतो, "हे गाणं नाशिक येथे शुट झालं आहे. तीन दिवस हे शुटं होतं. शुटींगच्या तिसऱ्या दिवशी निक आणि रितेशच्या फॅन्समुळे आम्हाला शुटिंग लोकेशन वरून लवकर निघालं लागलं. बाऊंसर असूनही प्रचंड गर्दी झाली. परंतु सगळ्यांनाच शुट करताना मजा आली. अभिजीत दानी यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. मी आणि संकेत गुरव आम्ही दोघांनी या गाण्याचं संगीत केलं आहे. या गाण्याची खास गोष्ट अशी की आम्ही पहिल्यांदाच या गाण्यात रॅप केला आहे. 'ट्रेंडींग चल रहा है' असं या रॅपचं नावं आहे. हा रॅप निक शिंदे आणि रितेश कांबळेनेच गायला आहे." संगीतकार प्रशांत नाकतीच्या 'मी सिंगल' अल्बमच्या चौथ्या भागात निक आणि रितेशला मुलगी भेटणारं का ? की ते सिंगलच राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं!!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत

Mumbai Best Bus Accident : मुंबईच्या गोरेगावमध्ये ट्रक आणि बेस्ट बसचा भीषण अपघात; 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी; 1 जुलै पर्यंतची मतदार यादी पात्र, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय