मनोरंजन

‘बॅन लिपस्टिक’चं रहस्य उलगडलं, ‘अनुराधा’ वेबसीरिज येणार

Published by : Lokshahi News

गेले काही दिवस सोशल मीडियावर 'बॅन लिपस्टिक'चा संदेश देत 'मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही' असे म्हणत अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसतानाच व्हिडीओ पाहायला मिळाला. हे नक्की काय आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. आता ही उत्सुकता संपली आहे.

अनुराधा या वेब सिरीज चा ट्रेलर लॉन्च सोहळा शुक्रवारी मुंबईत दिमाखात पार पडला. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही 7 भागांची बेबसीरिज प्लॅनेट मराठी ओटीटी, आणि व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजस्विनी पंडीत, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी-मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण अशी तगडी स्टारकास्ट या वेब सिरीजची स्टारकास्ट आहे. दिग्दर्शक संजय जाधव ह्यांनी ह्या वेब सिरीज चे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून संजय जाधव यांची ही पहिली पहिली वेब सिरीज आहे


ह्या सर्व अभिनेत्री लिपस्टिकचे समर्थन का करत नाही, लिपस्टिकचा आणि या वेबसिरीजचा काय संबंध, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या वेबसिरीजमध्ये दडलेली आहेत. नुकतीच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सस्पेन्स, थ्रीलर असा या वेबसीरिजचा जॉनर आहे. समांतरनंतर पुन्हा एकदा तेजस्विनीचा बोल्ड आणि हॉट अंदाज या वेबसीरिजमध्ये दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा