मनोरंजन

चैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज - जाऊ दे नं वं’

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Published by : Siddhi Naringrekar

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील निरागस 'चैतू' सर्वांनाच आवडला. आणि विशेष गाजले ते जयस कुमार यांनी गायलेले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभलेले 'जाऊ दे नं वं' हे जबरदस्त गाणे. आज इतक्या वर्षानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. दिवाळीत 'नाळ भाग २' प्रदर्शित होत असून या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'भिंगोरी' आणि 'डराव डराव' या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. यावरून ही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत, हे कळतेय. मात्र लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, 'जाऊ दे नं वं' हे सुपरहिट गाणं या चित्रपटात ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे.

नुकताच 'नाळ भाग २'च्या टीमचा चित्रीकरणादरम्यान सुरु असलेल्या पडद्यामागची धमालचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या दरम्यान मागे 'जाऊ दे नं वं' हे गाणे वाजत आहे. त्यामुळे आता हे गाणे चित्रपटात असणार का? याचे उत्तर प्रेक्षकांना १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे. दरम्यान झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २'मध्ये श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली