nagraj manjule Admin
मनोरंजन

नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो

नुकताच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर झळकला.

Published by : Siddhi Naringrekar

नुकताच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर झळकला. लाखोंनी या ट्रेलरला व्ह्यूज मिळाले असून प्रेक्षक ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सगळेच कलाकार खास भूमिकेत असून यात विशेष लक्ष वेधून घेत आहेत, ते नागराज मंजुळे यांचे ॲक्शन सिन्स. त्यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून याबाबतच्या सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दिप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे. मात्र ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये ते पडद्यामागे काम करण्याबरोबरच पडद्यावरही काम करणार आहेत. ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे डॅशिंग लूकमध्ये दिसत असून त्यांच्या या लूकवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज आवडला असून आता हा तडफदार पोलीस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे नागराज मंजुळेंच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला नवीन ॲक्शन हिरो मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला