मनोरंजन

नागराज मंजुळे नव्या रूपात; ‘या’ वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल चर्चेत असतात, नागराज मंजुळे फक्त चित्रपट निर्माते नसून ते चित्रपटात अभिनयाचे काम सुद्धा करतात. 'फँड्री' आणि 'सैराट' हे चित्रपट खुप गाजले. 'नाळ' चित्रपटात त्यांनी एका भुमिकेत काम सुध्दा केले.

नागराज मंजुळे हे आता एका नवीन वेबसीरीमध्ये काम करताना दिसणार आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या 'मटका किंग' नावाच्या वेबसीरीजमध्ये काम करणार आहे. ही वेबसीरीज सट्टेबाजीवर आधारित असणार असून ही वेबसीरीज सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

रतन खत्री यांच्या जीवनावर ही आधारित असणार आहे. रतन खत्री यांना भारतात जुगाराचे संस्थापक म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांना 'मटका किंग' म्हणून ओळखले गेले. ह्या वेबसीरीज मध्ये त्यांचा जीवन प्रवास सांगितला आहे.

60 ते 70 च्या दशकातील मुंबईच्या मजुर वर्गाची संस्कृती पाहायला मिळेल. ही वेबसीरीज अनोखी व मनमोहक असणार आहे. असे नागराज मंजुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं