Navin Prabhakar Marathi Movie Soham
Navin Prabhakar Marathi Movie Soham 
मनोरंजन

Navin Prabhakar : ‘पैचान कौन’ फेम नवीन प्रभाकर यांचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : गायक , अभिनेता आणि कॉमेडियन अशी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील वाटचाल करून "पैचान कौन" म्हणणारी ‘जुली - द बार गर्ल’ आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर’ मधून घराघरात पोहोचलेला नवीन प्रभाकर आपल्या सर्वांना ठाऊक आहेच.पण आता लोकांना मनसोक्त हसवल्यानंतर आता मात्र “सोहम” चित्रपटाच्या निमित्ताने एका गंभीर भूमिकेत आपण नवीन प्रभाकर ह्यांना बघणार आहोत. 'सोहम' मधली भूमिका हि काहीशी आऊट ऑफ द बॉक्स संधी नवीन प्रभाकर ह्यांच्यासाठी आहे.

'कृतांत' सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दत्ता मोहन भंडारे ह्यांचे दिग्दर्शन आणि संजय मंगेश बेहरे प्रदर्शित चित्रपट "सोहम" हि गुरुकुल शिक्षण पद्धतीवर अत्यंत सटीक मांडणी करणारी कथा आहे. गुरुकुल पद्धती कालबाह्य जरी झाली असली तरी ती शिक्षणाची किती प्रभावी पद्धत आहे ह्याचे उत्तम चत्रण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना नवीन प्रभाकर म्हणाले की , "कोरोना महामारीच्या काळात शिक्षणाचे डिजिटायझेशन झाले खरे पण हे डिजिटल शिक्षण ‘शाप कि वरदान’ असा प्रश्न हि पडलाच. इंग्रजी, हिंदी , मराठी मिडीयम च्या आधी गुरुकुल पद्धती होती जिथे विद्यार्थी 'शिष्य' आपल्या शिक्षकाकडे (गुरूंकडे) जाऊन 12 वर्ष शास्त्र, शस्त्र, विद्या आणि योग अभ्यास करत असत. आत्ता शिक्षणाचे जे इंग्रजीकरण झाले आहे ही खंत म्हणायला हरकत नाही. कारण शेवटी तुम्ही काय शिकलात तुमच्यावर शिक्षणाने काय संस्कार झाले ते जास्त महत्वाचे आहे.' असे मला वाटते ."स्वामी काड सिद्धेश्वर महाराज आणि कोल्हापूरच्या कन्हेरी येथील अनेक विद्यार्थ्यांचे गुरुकुल असलेला सिद्धगिरी मठ अशी चित्रपटाची संकल्पना आहे. चित्रपटातील पिता हे मठाधीश असतात , अत्यंत कटाक्षाने त्यांनी मठाचे नियम पद्धती अंगिकारलेली असते. आणि स्वामी म्हणताच आज आपला जो काही समज आहे त्याला फाटा देऊन खरोखरीच किती निस्वार्थ सेवाधारी एखादा मनुष्य असू शकतो त्यांच्या कडून आपल्याला कित्तेक गोष्टी शिकायला मिळतात अशी ती पित्याची प्रतिमा साकारली गेली आहे.

तर दुसरीकडे मुलगा (नवीन प्रभाकर) हा इंजिनियर असतो तो एका प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करतो आणि जेव्हा तो घरी जातो तेव्हा त्याच्या मुली आणि पत्नी त्याचे छान कुटुंब असा व्यक्ती चित्रित करण्यात आलं आहे. मुलाच्या पालकांना सुद्धा मुलाचे फार कौतुक असते परंतु पुस्तकी आणि बाहेरच्या शिक्षणपद्धतीचा प्रभावात असलेला इंग्रजी वातावरणात वावरणारा मुलगा, त्याला त्याच्या पित्याचे मठात जाणे किंवा तिथल्या पद्धती आचरणात आणणे हे न पटणारे असते.एकदा मात्र मुलीच्या हट्टापायी जेव्हा त्याला मठात जाण्याचा प्रसंग येतो आणि तिथे गेल्यावर त्या मठाचे आचार विचार तिथली पद्धती जेव्हा तो बघो तेव्हा त्याला सुद्धा मठाच्या शिक्षणपद्धतीचा विचार पटतो आणि तो त्या शिक्षणाचा समर्थक बनतो. त्याच क्षणी मुलगा त्याच्या वडिलांचे जाऊन पाय धरतो आणि त्यांना चुकीचे ठरविण्यासाठी त्यांची माफी मागतो.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य