मनोरंजन

KGF Chapter 2 चा नवा विक्रम

Published by : Team Lokshahi

KGF Chapter 1 प्रदर्शित झाल्यापासून याचा दुसरा भाग केव्हा प्रदर्शित होणार यासाठी लोक उत्सुक होते. कोरोनामुळे (corona) हा चित्रपट रिलीज होण्यास विलंब झाला. त्यामुळे चाहत्यांमध्ये अजून जोरदार उत्साह निर्माण झाला आहे. हा चित्रपट बघण्यासाठी लोक आवर्जून वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

लोकांच्या मनात KGF विषयी प्रचंड क्रेझ (Craze) निर्माण झालेली आहे. पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तेव्हापासून दुसरा बघण्यास उत्सुकता वाढली आहे. आता दुसरा भाग येणार असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच त्याने नवीन विक्रम केला आहे. ट्रेलर रिलीज (Trailer release) होताच 24 तासांत 109 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज (More than a million views) आले आहेत. आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाच्या ट्रेलरला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत.

KGF Chapter 2 चा रविवारी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट येत्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्तच्या रोलने या चित्रपटाचे लक्ष वेधले आहे. तसेच रविना टंडनच्या (Raveena Tandon) भूमिकेने या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवली आहे.

साऊथचे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) धमाल करत आहेत. याआधी पुष्पा आणि RRR या चित्रपटांच्या कमाईतून हे सिद्ध झाले आहे. चित्रपटात यश, संजय दत्त (Sanjay Dutt) समवेत प्रकाश राज (Prakash Raj) आणि रविना टंडन याच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील (Prashant nil) याने केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा