bharti singh Team Lokshahi
मनोरंजन

कॉमेडी क्विन भारतीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Published by : Team Lokshahi

कॉमेडी क्वीन भारती सिंहने (Bharti Singh) चाहत्यांना गोड बातमी दिली. भारती आणि हर्ष यांना मुलगा झाला आहे. एक खास पोस्ट शेअर करत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी 'It’s a BOY' म्हणत सोशल मीडियावर (social media) ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीए. यानंतर चाहत्यांनीही भारती आणि हर्षवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी (Celebrities) भारतीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्यात. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये (comments) लिहिलं की, 'आम्ही छोट्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहे '.

भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. भारतीने यूट्यूब चॅनलवर (youtube channel) व्हिडिओ शेअर करत गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. विशेष म्हणजे भारतीनं गरोदरपणात काम करणं थांबवलं नव्हतं. दोन दिवसांपूर्वीच तिनं एका शोचं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्यामुळं तिच्या या कृतीचं सर्वांनी कौतुक केलं आहे. तसेच ती अनेक महिलांसाठी आदर्श ठरली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा