bollywood actor Team Lokshahi
मनोरंजन

कास्टिंग काऊच : टीव्ही अभिनेत्याकडे न्यूड फोटोची डिमांड

Published by : Akash Kukade

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच (casting couch) हा भयंकर प्रकार असून प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री तसेच टेलिव्हिजन कलाकार असो की मोठ्या पडद्यावरील कलाकार यांना सर्वांनाच या गोष्टींचा सामना करावा लागतो.

या संदर्भात काही कलाकार आपली बाजू स्पष्ट मांडतात तर काही गप्प बसतात. याविषयीचा कटू अनुभव छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला. भूमिका देण्याच्या बदल्यात त्याच्याकडे न्यूड फोटोंची मागणी करण्यात आली.

छोट्या पडद्यावर इश्कबाज, बेहद २ आणि लाल इश्क या मालिकेतून लीड भूमिका साकारणारा अंकित सिवाच (Ankit Siwach) याने एका मुलाखतीत या कास्टिंग काऊचविषयी मोठा खुलासा केला आहे. युपी मधील मेरठ मधून आलेल्या अंकितने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्या सुरुवातीच्या दिवसातील स्ट्रगलमुळे खूप वाईट अनुभवांना सामोरं जावं लागल्याने त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

सीरियल मध्ये काम देण्याचं आमिष दाखवत खूप विचित्र पार्ट्यांना बोलावलं जायचं. मला पहिल्यांदा वाटायचं प्रत्येकजण चांगला आहे, म्हणून मी काही गोष्टींकडे ठरवून दुर्लक्ष करायचो. पण एकदा चक्क माझ्याकडे न्यूड फोटोची डिमांड केली गेली. तेव्हा मात्र मला मोठा धक्क बसला होता. अनेकदा विनावस्त्र काढलेले फोटो पाठवायला सांगायचे. मला अशा पार्ट्यांना बोलावलं जायचं, ज्याचा कामाशी काहीही संबंध नसायचा. एका पद्धतीची पिळवणूक होती ती,ज्यासाठी मी तयार नसायचो. माझ्यासोबत दिल्लीत असताना जे काही झालं, त्यामुळे मी खूप मोठ्या अडचणींचा सामना करायला आता तयार आहे, असे अंकितने सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा