मनोरंजन

OMG 2: ओह माय गॉड! सेन्सॉर बोर्डानं दिलं 'ए' सर्टिफिकेट? पण...

बोर्डानं या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिले आहे.

Published by : Team Lokshahi

अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 'ओह माय गॉड’;चित्रपट बराच गाजला होता. ओह माय गॉडचा पहिला पार्ट ज्यावेळी प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. अक्षय कुमारचा ओह माय गॉडचा दुसरा पार्ट हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर गदर २ सोबत होणार आहे. मात्र यासगळ्यात हा चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडल्याचे दिसून आले आहे. आता अशी बातमी समोर आली आहे की, सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं निर्मात्यांना मोठा धक्का दिला आहे.

बोर्डानं या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. प्रदर्शनापूर्वी ओह माय गॉड २ चे दिग्दर्शक प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे बोर्डाला अक्षय कुमारचा हा चित्रपट वादग्रस्त वाटत असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे की काय बोर्डानं दिग्दर्शकाला या चित्रपटामध्ये आणखी २० कट्स सुचवले आहेत. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एखाद्या चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट मिळणे म्हणजे लहान मुलं आणि कुटूंबासमवेत हा चित्रपट पाहता येणार नाही. यासगळयाचा मोठा फटका चित्रपट निर्मात्यांना बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका