मनोरंजन

परळच्या इच्छापूर्ती गणपतीच्या निमित्ताने अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या खास आठवणींना मिळाला उजाळा...

Published by : Siddhi Naringrekar

परळ इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या उत्सवासाठी रंजनाताई यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत अशाच अनेक आठवणींना मिळाला उजाळा, निमित्त होते 'रंजना अनफोल्ड' या चित्रपटाच्या निर्माती आणि कार्निवल मोशन पिक्चर्स च्या संचालिका/डायरेक्टर वैशाली सरवणकर आणि लेखक ,दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी या मंडळाच्या गणपतीला नुकत्याच दिलेल्या भेटीचे...

कार्निवल ग्रुपचे चेअरमन डॉ. श्रीकांत भासी प्रस्तुत  'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाची निर्मीती, कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संचालिका/डायरेक्टर  वैशाली सरवणकर यांनी केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन करत आहेत. पुढील वर्षी ३ मार्च २०२३ रोजी  'रंजना - अनफोल्ड' प्रदर्शित करण्याची योजना आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री  रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.

दरवर्षी परळच्या लाल मैदान गणेश चतुर्थीचा उत्सव जल्लोषात साजरा व्हायचा. रंजनताईंचा गणेश मंडळात उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा, त्यांच्या अपघात नंतर ही त्या तिथे व्हीलचेअर वर जाऊन बाप्पाचा आशीर्वाद आवर्जून घ्यायच्या, त्याच बरोबर रंजनाताईंसोबत इतर कलाकार हि या मंडळाला भेट देत होते त्यामुळे परळ विभागात इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळख असलेला हा गणपती रंजना ताई यांचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे. म्हणून रंजना अनफोल्ड च्या टीमने जाऊन चित्रपटाचा शुभारंभ तिकडून केला,

कार्निवल मोशन पिक्चर्सचा ठाकरे आणि  सचिन (अ बिलियन ड्रीम्स) ह्या बायोपिक नंतर आता रंजना  अनफोल्ड  हा बायोपिक  बघण्यासाठी प्रेक्षक फारच आतुरतेने वाट बघत आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा