मनोरंजन

आरआरआर मूव्ही फक्त १ रुपयात पाहण्याची संधी

Published by : Team Lokshahi

मुंबई, २४ मार्च २०२२: भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स (Digital payments) आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची (Paytm) मालकी धारण करणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) आज आकर्षक यूपीआय (UPI) -आधारित ऑफरची offer घोषणा केली, त्यामुळे चित्रपटप्रेमींना ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) व राम चरण Ram Charan अभिनेते – 'आरआरआर' मूव्ही (RRR) वाऊचर्स (Vouchers) जिंकण्याची संधी मिळेल.

पेटीएम युजर्स (Paytm users) पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून ९७११६५६५६५ या क्रमांकावर १ रूपया त्वरित मनी ट्रान्सफर करत २१ मार्च ते २७ मार्चपर्यंत जवळपास १५० रूपये किंमतीचे मोफत आरआरआर मूव्ही वाऊचर्स (Movie vouchers) जिंकू शकतात. यानंतर पेटीएम अॅपच्या माध्यमातून आरआरआर चित्रपटाचे तिकिटे बुक करताना युजर्स हे वाऊचर्स रिडिम करू शकतात. यासाठी त्यांना पेटीएम अॅपवर तिकिट बुक करताना वाऊचर प्रोमो कोड प्रविष्ट करावा लागेल.

पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, "आम्ही भारतामध्ये डिजिटल पेमेण्ट्सचा उच्च अवलंब व स्वीकृतीला चालना देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या पेमेंट साधनांसह आम्ही अधिकाधिक युजर्सना त्यांच्या आर्थिक प्रवासामध्ये सक्षम करण्याची आशा करतो. पेटीएम यूपीआय अत्यंत गतीशील व सुरक्षित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. आमच्या युजर्सचे चित्रपटांप्रती प्रेम पाहता आमची आरआरआर मूव्ही वाऊचर्ससाठी नवीन यूपीआय ऑफरसह कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा आहे."

आरआरआर हा बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपट आहे, जो जगभरात २५ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. एसएस राजामौली यांचे दिग्‍दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये प्रतिभावान कलाकार आहेत- जसे ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस, समुतीरकाणी, अलिसन दूडी, श्रीया सरण आणि रे स्टिव्हन्सन.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय