मनोरंजन

Oscars 2022 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने क्रिस रॉक च्या कानशिलात लगावली…

Published by : Shweta Chavan-Zagade

तब्बल तीन वर्षांनंतर ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा पार पडत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात पारितोषिकांचे वितरण सुरु असतानाच मोठा राडा झाला आहे. हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विल स्मिथ (will smith) याने कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक (chris rock) यांच्या कानाखाली मारली आहे. रॉक याने विल स्मित यांच्या पत्नीवर विनोद केल्याने विल स्मिथ यांचा संताप अनावर झाला.

क्रिस रॉक याने G. I. JANE या चित्रपटावरून विल स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ यांची थट्टा केली. जेडाच्या 'टक्कल' असण्यावरून त्याने भाष्य केले. परंतु जेडा यांनी अलोपेसिया या गंभीर आजारामुळे केस काढले आहेत. पत्नीची चुकीच्या पद्धतीने झालेली ही थट्टा सहन न झाल्याने स्मिथ यांचा पारा भडकला आणि त्यांनी रॉक यांच्या कानाखाली मारली.

विल स्मिथला ऑस्कर

विल स्मिथला यावर्षी त्याच्या किंग रिचर्ड या चित्रपटासाठी ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. याच चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा