मनोरंजन

Panchayat actor Asif Khan : "आयुष्यात काहीही होऊ शकतं..." – 'पंचायत' फेम आसिफ खानला हार्ट अटॅक; शेअर केली भावनिक पोस्ट

आसिफ खानच्या हृदयविकाराच्या धक्क्याने चाहत्यांमध्ये चिंता

Published by : Team Lokshahi

‘पंचायत’ या गाजलेल्या वेबसीरिजमधून ‘दामादजी’ या आपल्या सोज्वळ भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता आसिफ खान आज स्वतःच्या आयुष्याच्या नव्या वळणावर उभा आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला होता. ही धक्कादायक माहिती खुद्द आसिफने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी चुकला.

आसिफने हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर करत लिहिलं, "आयुष्यात काहीही होऊ शकतं हे मी गेल्या 36 तासात अनुभवलं आहे. आयुष्य एक भेट आहे. ते जपा". आयुष्य किती अनिश्चित आहे, याची जाणीव त्याला या अपघातामुळे झाली. पुढे तो म्हणतो, "कधीही वाटत नाही असा प्रसंग एकदम समोर येतो. तेव्हा आपण आपल्याजवळ असलेल्या लोकांची किंमत ओळखायला शिकतो."

हृदयविकाराच्या धक्क्यातून तो आता हळूहळू सावरतो आहे. “मी रिकव्हर होतोय... आणि सध्या स्वतःला बरं वाटतंय,” असंही त्याने स्पष्ट केलं. त्याचं एक वाक्य मन हेलावून टाकतं – "तुमचा प्रेम, काळजी आणि शुभेच्छा – ह्याचं महत्त्व मी आज नव्यानं समजलो आहे..."

आसिफ खान हा केवळ 'पंचायत'पुरताच मर्यादित नाही. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’, ‘परी’, ‘पगलैट’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘काकूदा’ आणि अलीकडेच आलेला ‘द भूतनी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे, ‘मिर्झापूर’, ‘पाताल लोक’, ‘जमतारा’, ‘देहाती लड़के’ या गाजलेल्या वेबसीरिजमधूनही त्याने आपली एक वेगळी छाप पाडली आहे.

सध्या तो वैयक्तिक काळजी घेत असून, लवकरच कामावर परतणार असल्याचा विश्वास त्याने दिला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्याच्या लवकर पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा