मनोरंजन

Parineeti Chopra: आगामी चित्रपटासाठी परिणीती चोप्राने वाढवले तब्बल १५ किलो वजन

लग्नानंतर परिणीती चोप्रा करणार चित्रपटसुष्टीत पर्दापण. 'चमकीला' चित्रपटासाठी परिणीतीने वाढवले तब्बल १५ किलो वजन.

Published by : Team Lokshahi

परिणीती चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्राने 'आप'चे नेता राघव चढ्ढा यांच्यासोबत राजस्थानमध्ये अत्यंत शाही थाठात लग्न पार पडले.

लग्नानंतर परिणीती चोप्राने चित्रपटसुष्टीत पर्दापण करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच परिणीतीने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडियो शेअर केला आहे. ज्यामुळे परिणीती चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

परिणीती चोप्राने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडियो शेअर करत आपल्या आगामी चित्रपटाची माहिती देत लिहिले, "मी गतवर्षी रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये गाण्यात 6 महिने घालवले, आणि घरी परत जाऊन चमकिलासाठी 15 किलो वाढवणे आणि शक्य होईल तेवढे खाणे सुरू ठेवले! (नेटफ्लिक्सवर लवकरच येत आहे). संगीत आणि अन्न. असा माझा दिनक्रम होता.

आता चित्रपट झाला तरी कथा उलट आहे. मला स्टुडिओची आठवण येते आणि मी पुन्हा पहिल्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करत आहे. अमरजोतजी सारखे नाही! ते कठीण झाले आहे. पण तुमच्यासाठी काहीही इम्तियाज सर! आणि ही भूमिका अजून बरेच इंच जायचे आहेत".

परिणीती चोप्राने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळते. चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू