मनोरंजन

Pathan 2022| लवकरच खान चाहत्यांच्या भेटीला येणार…

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान उद्यापासून 'पठाण' (pathan) चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करेल . सप्टेंबरच्या अखेरीस चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी स्पेन आणि युरोपला जाणार आहे . 2018 मध्ये रिलीज झालेल्या झिरो चित्रपटात अभिनेता शेवटचा दिसला होता. तेव्हापासून सर्व खान चाहते शाहरुखचा चित्रपट येण्याची वाट पाहत होते. लवकरच खान चाहत्यांच्या भेटीला येणार आहे

सूत्राच्या माहिती नुसार, युरोपमध्ये शूटिंगचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. पण तारखा अद्याप निश्चित करण्यात आल्या नाहीत. पठाण चित्रपठाचे उर्वरित शूटिंग हे स्पेन राजधानीच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी करण्यात येईल.
शाहरुख खानने या चित्रपटाच्या दुबई (Dubai) शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे.तसेच या चित्रपटामध्ये सलमान खान म्हणजेच भाईजानची झलक पाहायला मिळणार आहे. जे अद्याप ही अधिकृतपणे घोषणा झाली नाहीये. दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम ही महत्वाची भूमिका साकारणार आहे .

दुसरे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शूटिंग थांबवण्यात आले होते. मात्र आता पुन्हा सुरु करण्यात आले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यात आहे. यशराज स्टुडिओ (Yash Raj Films) निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा