Payal Rohatgi,Sangram Singh Team Lokshahi
मनोरंजन

Payal Rohatgi Wedding : पायल रोहतगी अन् संग्राम सिंग अडकणार लग्नाच्या बेडीत

Payal Rohatgi Wedding Date : पायल रोहतगी सध्या चर्चेत आहे.

Published by : shweta walge

पायल रोहतगी (Payal Rohatgi) सध्या चर्चेत आहे. अलीकडेच पायल 'लॉकअप' (Lockup) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये (Reality show) दिसली होती आणि ती या शोची फर्स्ट रनरअप होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर पायलने आता तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. पायल गेल्या 12 वर्षांपासून संग्राम सिंगला (Sangram Singh) डेट करत आहे आणि आता दोघांनीही त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. पायल रोहतगी आणि संग्राम सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह या दोघांनीही इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत, ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. संग्राम सिंग हा एक कुस्तीपटू (Wrestler) आहे आणि पायल देखील तिच्या बेधडकपणासाठी ओळखली जाते.

फोटो शेअर करत 'सेव द डेट' (Save the date) असे कॅप्शन दिले आहे. त्याचवेळी, दोघांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ते या जुलैमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अजून त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण पायल आणि संग्रामच्या लग्नाशी संबंधित काही बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जातोय, की दोघंही 21 जुलैला लग्न करू शकतात.

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत, मात्र अद्याप लग्न करण्याचा निर्णय का घेतलेला नाही. पायलने याबाबत 'लॉकअप'मध्ये सांगितले होते. पायलने शोमध्ये सांगितले होते की ती कधीही आई होऊ शकत नाही. IVF सारखे अनेक तंत्र त्यांनी आजमावले पण काही उपयोग झाला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा