Payal Rohatgi Team Lokshahi
मनोरंजन

Payal Sangram Wedding : पायल रोहतगीने संग्रामच्या नावाची काढली मेहंदी

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Published by : shweta walge

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या प्री-वेडिंग फंक्शन्सही (Pre-wedding functions) सुरू झाले आहेत. अभिनेत्री 9 जुलै रोजी आग्रा येथे तिचा प्रियकर संग्राम सिंगसोबत (Sangram Singh) सात फेरे घेणार आहे. नुकतेच प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'लॉक अप'च्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या पायल आणि संग्रामने या शोदरम्यानच त्यांच्या लग्नाची घोषणा केली. तर नुकताच तिच्या मेहंदी सेरेमनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पायलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केली आहेत. या व्हिडिओमध्ये पायलच्या हाताला आणि पायांना मेंहदी लावलेली दिसत आहे. गुलाबी रंगाच्या बांधणी सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय तिच्या हातावर आणि पायावरची मेहंदीही खूप उठून दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पायल रोहतगी आणि संग्राम सिंग सर्वायव्हर इंडियाच्या सेटवर भेटले होते. यानंतर दोघांनी मैत्रीचे नाते सुरु केले आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 12 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर काही दिवसांत हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. संग्राम सिंगने नुकतेच जाहीर केले की तो पायलसोबत जुलैमध्ये लग्न करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा