मनोरंजन

मराठी अल्बम इंडस्ट्रीतील 'पहिलंच ऐतिहासिक प्रेमगीत' ठरलं 'पिरतीचं याड', 'नादखुळा म्युझिक'वर गीत प्रदर्शित

प्रसिद्ध संगीतकार 'प्रशांत नाकती' घेऊन आलायं एका शूरवीराची ऐतिहासिक प्रेमकहाणी, 'नादखुळा म्युझिक'वर 'पिरतीचं याड' गाणं प्रदर्शित !

Published by : Siddhi Naringrekar

'मिलीनीयर' 'प्रशांत नाकती' नवनवीन मराठी अल्बम गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. यावेळेस 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक शिवकालीन ऐतिहासिक असं 'पिरतीचं याड' गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी अल्बम गाण्यांमधील हे पहिलचं गाणं आहे जे ऐतिहासिक काळावर भाष्य करणारं आहे. शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असं हे सुवर्णकाळातलं सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे. शिवाय अवघ्या काही सेकंदातच सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल होत आहे.

या गाण्यात प्रशांतने ऐतिहासिक काळातील पती पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारी कलाकृती रेखाटली आहे. त्यामुळे ही आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'पिरतीचं याड' या गाण्याचं संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. या गाण्याचे गीतकार प्रशांत नाकती आणि गणेश व्हटकर आहेत. तर गायक 'रविंद्र खोमणे' आणि गायिका 'सोनाली सोनावणे' हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन अभिजीत दाणी यांनी केले आहे. या गाण्यात अभिनेता विशाल फाले आणि अभिनेत्री तृप्ती राणे हे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र 'पिरतीचं याड' गाण्याच्या रील्स व्हिडिओची चर्चा आहे.

'पिरतीचं याड' या गाण्याविषयी प्रशांत नाकती सांगतो, "आपलीच हवा, मी सिंगल, आपली यारी या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर आम्ही एक ऐतिहासिक प्रेमकहाणी तुमच्यासाठी घेऊन यायची आमची इच्छा या गाण्याच्या स्वरूपात पूर्ण झाली. इतिहासातील एका मावळ्याचं जोडपं आहे. जे आपल्या मायभूमीसाठी लढले आहेत. त्यांचं आयुष्य खडतर होतं तसचं त्यांच्या कुटुंबाशी असलेलं‌ नातं यात मांडलं आहे. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा या गाण्यात दिसून येतो. आपल्या मायभूमीसाठी केलेला लढा, त्याग, समर्पण आणि प्रेम याचं संदेश देणारं हे गाणं आहे."

पुढे तो सांगतो, "आम्ही मुबलकश्या पैशात आणि खूप कमी वेळेत फक्त मेहनतीच्या जोरावर या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यात VFX चा वापर केला आहे. आम्हाला शिवकालीन वाडा तयार करायला तीन दिवस लागले. २०२३ या नववर्षाची सुरुवात आम्ही 'पिरतीचं याड' या गाण्याने करत आहोत. माझ्या सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो की त्यांनी नादखुळा म्युझिक आणि 'पिरतीचं याड' या गाण्यावर भरभरून प्रेम केलं. तुमचं असचं प्रेम कायम राहू देत."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा