मनोरंजन

स्मार्टफोनवर चित्रिकरण; पहिला मराठी चित्रपट येतोय तुमच्या भेटीला

Published by : Vikrant Shinde

'पॉंडीचेरी' हा मराठी चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'गुलाबजाम' सारख्या दर्जेदार चित्रपटाची मेजवानी दिल्यानंतर आता सचिन कुंडलकर 'पॉंडीचेरी'ची सैर घडवणार आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य 'पॉंडीचेरी' आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.
निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या 'पाँडीचेरी' शहरात घडणारी ही कथा आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल असल्याचे जरी दिसत असले तरी नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या 'पाँडीचेरी'च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास दिसत आहे. हा प्रवास त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील हा गुंता सुटतो का, हे 'पाँडीचेरी' पाहिल्यावरच कळेल.


सई ताम्हणकर आपल्या भूमिकेबद्दल सांगते, " यात मी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे, जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही." असे तिने सांगितले.


"माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल. असे वैभव तत्ववादी म्हणाला आहे.
'पाँडीचेरी'तील आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, " मी एक अशी व्यक्तिरेखा साकारतेय, जिचे आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या भूमिकेसाठी हो म्हणायचे मुख्य कारण म्हणजे ही कथा मला खूप भावली आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी खूपच रंजक पद्धतीने ती मांडली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक