दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा 'पोनियिन सेल्वन' उर्फ 'पीएस 1' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तर आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पोनियिन सेल्वनचा टीझर (Ponniyin Selvan Teaser) रिलीज झाला आहे. हा चित्रपट चोल साम्राज्यावर आधारित असून हा चित्रपट जबरदस्त असणार आहे हे टीझरवरून स्पष्ट होत आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये विक्रम, कीचा सुदीप आणि जयम रवी दिसत आहेत. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहेत. सोबतच टीझरमध्ये मोठी जहाजे, हत्ती-घोडे आणि राजवाडे दाखवण्यात आले आहेत. 'पोनियिन सेल्वन'चा हा टीझर एकदम आलिशान दिसत आहे.