Ponniyin Selvan Team Lokshahi
मनोरंजन

Ponniyin Selvan : राजकुमारी कुंदवईच्या भूमिकेत त्रिशा कृष्णनचा लूक

ऐश्वर्यानंतर साऊथ अभिनेत्रीचा फर्स्ट लूक आला समोर

Published by : shweta walge

सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा बहुप्रतिक्षित पोन्नयान सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांनी या मेगा बजेट चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे.

या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातील कलाकारांचे लूक सतत प्रसिद्ध करत असतात. आतापर्यंत तमिळ सुपरस्टार विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि कार्ती यांचे फर्स्ट लूक पोस्टर्स समोर आले आहेत. आता निर्मात्यांनी तमिळ सिनेमातील डस्की (Trisha) ब्यूटी त्रिशा कृष्णनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे.

तिचा फर्स्ट लुक रिलीज करताना, अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्रामवर लिहिले, 'पुरुषांच्या जगात, एक धैर्यवान स्त्री...कुंडवईच्या राजकुमारीला भेटा. पोन्नयान सेल्वन 30 सप्टेंबर रोजी तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.


पोनियिन सेल्वन 30 सप्टेंबर रोजी तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम तसेच हिंदीमध्ये रिलीज होत आहे. हा चित्रपट 10 व्या शतकातील आहे, जो 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून दोन्ही भाग एकाच वेळी शूट करण्यात येत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा