मनोरंजन

Shivrayancha Chhava: 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाचे दमदार पोस्टर आऊट!

'शिवरायांचा छावा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झाला आहे.

Published by : Team Lokshahi

'शिवरायांचा छावा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झाला आहे. 'शिवरायांचा छावा' या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने सांभाळली आहे. या सिनेमाचं चित्तथरारक पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे. मराठमोळा अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा' येत्या 16 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

'शिवरायांचा छावा'च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. हा पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी "रक्तात उकळतो भगवा हा लाव्हा, रुद्ररुप गर्जतो शिवरायांचा छावा" असं कॅप्शन देत पोस्टर शेअर केले. बलदंड शरीरयष्टी, करडी नजर आणि जबरदस्त आत्मविश्वास असा छत्रपती संभाजी महाराजांचा हा लूक दिसतोय. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, संभाजी महाराज एका शक्तिशाली वाघासोबत झुंज देताना दिसत आहेत. पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मराठमोळा अभिनेता भूषण पाटील यांनी उचललं आहे.

दरम्यान, ‘स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतः मरणांतिक यातना सहन करून, स्वराज्याला जीवनदान देणाऱ्या अशा या महान पराक्रमी राजाची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे भूषण सांगतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Latest Marathi News Update live : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Mumbai Arthur Road Jail : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये दोन गटात हाणामारी

Hotel and Restaurant Strike : आज राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार; कारण काय?