मनोरंजन

प्रभासने शेअर केला ‘राधे श्याम’ चा टीझर

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

दाक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली प्रभासने नुकताच त्याचा आगामी 'राधे श्याम' चित्रपटाचा टीझर शेअर केला. या चित्रपटची २०१८ मध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ 5 भाषांमध्ये तेलुगु, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत शेअर करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रभासने त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे.

या चित्रपटात प्रभाससोबत मुख्य भूमिकेत पूजा हेगडे दिसणारआहे. टीझरवरून या चित्रपटात प्रभास रोमँटिक लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रभास रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर इटालियन भाषेत आपल प्रेम व्यक्त करताना दिसत हा . 'राधे श्याम' हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज झाला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन