अभिनेत्री प्राजक्ता माळी आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा'काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार श्री.प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले.
आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, "कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे.
या वेळी अध्यक्षस्थानी 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. या व्यतिरिक्त प्राजक्ताचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवारही तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता.