मनोरंजन

Patthe Bapurao Movie: लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र आता रुपेरी पडद्यावर

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी "कच्चा लिंबू", "हिरकणी", "चंद्रमुखी" अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आले.

स्वरुप स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे,सपना लालचंदानी हे "पठ्ठे बापूराव" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे. श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत "पठ्ठे बापूराव" या नावानं प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या.

त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...