Social Media Influencer Prasad and Deepika  
मनोरंजन

Social Media Influencer Prasad and Deepika : ‘प्रसिका’चे अकाउंट अचानक बंद; “माझ्या किंवा माझ्या पत्नीचं काही बरं-वाईट झालं…” प्रसाद वेदपाठकची पोस्ट चर्चेत

अकाउंट्स बंद झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांनी व्हिडीओद्वारे आपली नाराजी व्यक्त केली. “आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केले नाही.

Published by : Riddhi Vanne

Social Media Influencer Prasad and Deepika Vedpathak Channel : मराठी सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडी ‘प्रसिका’ म्हणून ओळखले जाणारे प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांना अचानक सस्पेंड करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. गेली दहा वर्षे डिजिटल विश्वात सक्रिय असलेल्या या जोडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अकाउंट्स बंद झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांनी व्हिडीओद्वारे आपली नाराजी व्यक्त केली. “आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केले नाही. तरीही आमची दहा वर्षांची मेहनत एका रात्रीत हिरावून घेतली गेली,” असे ते म्हणाले. त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याशिवाय प्रसाद यांनी X या माध्यमावर पोस्ट करत गंभीर इशारा दिला. “जर माझ्या किंवा माझ्या पत्नीचं काही बरं-वाईट झालं, तर याला फक्त सोशल मीडिया जबाबदार असेल,” असे त्यांनी लिहिले. या विधानानंतर चर्चांना अधिक उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या अकाउंट्सवर नेमकी कोणती नियमभंगाची कारवाई झाली, याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रसाद आणि दीपिका दोघेही त्यांची खाती पुन्हा सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

‘प्रसिका’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचे कुकिंग व्हिडीओ आणि कौटुंबिक आशयाचे कंटेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असत. इन्स्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्मवर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अकाउंट सस्पेंड प्रकरणामुळे सोशल मीडिया क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  1. प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक.

  2. दोन दशकांहून अधिक काळ सोशल मीडियावर सक्रिय.

  3. प्रसिका जोडीच्या सर्व व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड.

  4. कोणतीही पूर्वसूचना न देता अकाउंट्स बंद.

  5. सोशल मीडियावर मोठी खळबळ.

  6. दीर्घकाळ डिजिटल विश्वात सक्रिय असलेल्या जोडीसाठी मोठा धक्का.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा