महाकुंभ हा हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचा मेळा आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक उत्सव असल्याच म्हटलं जात. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या कुंभमेळ्यामध्ये ९ कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.
या महाकुंभमेळ्यात नेत्यांसह अभिनेत्यांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे. त्यामधील एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे हा त्याची पत्नी स्नेहासोबत कुंभमेळ्यामध्ये सामील झाला आहे. स्नान करतानाचा व्हिडिओ अधिकृत सोशलमिडियावर पोस्ट करत त्यांने चाहत्यांना बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये प्रविण तरडे हा भगव्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. तर, स्नेहा तरडे ही भगव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहेत. तसेच प्रविण तरडे त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "अद्भुत अनुभव त्रिवेणी संगम स्नान, २९ जानेवारी २०२५, मौनी अमावस्या, महाकुंभ २०२५, प्रयागराज, उत्तर प्रदेश". चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे.
मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक म्हणून प्रविण तरडेला ओळखलं जातं. प्रविण तरडे याने मुळशी पॅटर्न, धर्मवीर, धर्मवीर २ यासारखे दर्जदार चित्रपट सिनेसृष्टीला दिले. मराठी सिनेसृष्टीमधील एक परफ़ेक्ट कपल म्हणून प्रविण- स्नेहाकडे पाहिले जात आहे. प्रविणसोबत आता स्नेहासुद्धा दिग्दर्शनाकडे वळली आहे. नुकताच तिने 'फुलवंती' नावाचा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे.